⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगाव लाईव्ह आयोजित ; माझा घरचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव – २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. निसर्ग मनुष्याला वारंवार स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असून मनुष्य आताच सुधारला नाही तर भविष्यात मानव जातच नष्ट होण्याचा धोका आहे. निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण बचावासाठी अधिकाधिक नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी जळगाव लाईव्ह न्यूज व स्नेहल प्रतिष्ठान घेऊन येत आहेत ‘माझा घरचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव २०२१’ स्पर्धा.

आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन उद्या होत आहे. गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना रूढ होत आहे. स्नेहल प्रतिष्ठान व जळगाव लाईव्हतर्फे ‘माझा घरचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या घरगुती बाप्पाची स्थापना करताना गणेश मूर्ती, सजावटीचे सामान, पर्यावरण बचावचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न करणाऱ्या घरगुती बाप्पाला आम्ही प्रसिद्धी देणार आहोत.

आपल्याला काय करायचंय!
आपल्या घरातल्या बाप्पाचे आणि सजावटीचे २-३ फोटो आम्हाला 7020588288 या क्रमांकावर व्हाट्सअँपद्वारे पाठवावे. दररोज तीन भाविकांना आमच्यातर्फे एक भेटवस्तू देण्यात येईल. तसेच एका भाविकाच्या घरी येऊन बाप्पाच्या आरतीचे चित्रीकरण करून कुटुंबाची मुलाखत देखील घेणार आहोत.

स्पर्धेचे नियम व अटी
१) गणेशमूर्ती पर्यावरण पूरक असावी.
२) आरास साहित्य पर्यावरण पूरक असावे.
३) पर्यावरण पूरक संदेश असावा.
४) पर्यावरण संवर्धनाचा संकल्प असावा.

हजारोंची बक्षिसे आणि डिस्काउंट कूपन
जळगाव लाईव्ह आयोजित ‘माझा घरचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव २०२१’ स्पर्धेत दररोज तीन विजेत्यांना मनमोहन आईस्क्रीमतर्फे फॅमिली पॅक आईसक्रीम, विजय इलेक्ट्रॉनिक्सतर्फे डिस्काऊंट कूपन दिले जाणार आहे. तसेच दहा दिवसानंतर निवडल्या जाणाऱ्या तीन विजेत्यांना स्नेहल प्रतिष्ठानतर्फे आकर्षक भेटवस्तू, इन्क्रेडिबल कॉम्प्युटर्सतर्फे फ्रीलान्स हा शासनमान्य कॉम्प्युटर कोर्स आणि सर्व स्पर्धक भाविकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.