fbpx

जळगावकरांचे हाल काही थांबेना ; ५८ काेटींच्या कामांचे नव्याने करावे लागणार नियाेजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । महापालिकेला ५८ कोटींचा निधी मिळालं होता. मात्र त्याचे नियोजन अजूनही होत नसल्याचे नागरिक संतप्त झाले आहेत. शहरातील सहा रस्त्यांची जबाबदारी पीडब्ल्यूडीकडे गेल्यामुळे ५८ काेटींच्या कामांचे नव्याने नियाेजन करावे लागणार आहेत. तर ४२ काेटींच्या कामांसंदर्भात सुरु असलेल्या वादामुळे समन्वयाने तडजाेडीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र येत हाल होत आहेत ते जळगावकरांचे.

महापालिकेत भाजपची सत्ता असताना दाेन वर्षे शंभर काेटींच्या कामांचे नियाेजन हाेऊ शकले नव्हते. अखेर नियाेजन झाले तर राज्यातील सत्ता बदलली हाेती. १०० पैकी ४२ काेटींच्या कामांचे कार्यादेश दिले तर शासनाने स्थगिती दिली आहे. महापालिकेत सत्ता बदलली तर ४२ काेटींची कामे रद्द करण्याचा ठराव झाला. या ठरावाच्या विराेधात भाजपतर्फे उच्च न्यायालयात धाव घेण्यात अली आहे. आता राज्य सरकार व महापालिकेचे सूर जुळायला सुरुवात झाली असताना स्थानिक वादामुळे विकास कामे सुरू हाेऊ शकत नसल्याची स्थिती आहे. या संपूर्ण जांगडगुत्त्यातून सुटका करण्यासाठी समन्वय, व्यवहार्यता, तडजाेडीची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्याची सुरुवातही करण्यात आली असून, सत्ताधारी व विराेधकांत बैठक झाल्याची चर्चा आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज