fbpx

जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर, पहा कुणाचा आहे समावेश

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या शाळेतील शिक्षक आणि उपशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या सन २०२०-२१ ची यादी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केली आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा झाली असून १५ शिक्षकांचा त्यात समावेश आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केलेल्या यादीत पदवीधर शिक्षक सुभाष देसले चिंचपुरे, ता.पाचोरा, सोमनाथ देवराज आखतवाडे ता.चोपडा यांच्यासह उपशिक्षक दिनेश रमेश मोरे मारवड ता.अमळनेर, उपशिक्षिका मनिषा सुपडू पाटील वढवे नवे ता.भडगाव, नामदेव महाजन मोंढाळे ता.भुसावळ, योगेश घाटे नाडगाव ता.बोदवड, ओमप्रकाश थेटे पिंपळगाव ता.चाळीसगाव, माधुरी देसले दोनगाव ता.धरणगाव, पद्माकर पाटील टाकरखेडा ता.एरंडोल, मोनिका चौधरी वडली ता.जळगाव, माया शेळके खादगाव ता.जामनेर, विकास पाटील टाकळी ता.मुक्ताईनगर, सीमा पाटील हिवरखेडे खु. ता.पारोळा, गजाला सैय्यद शाळा नंबर १ ता.रावेर, संदीप पाटील डांभुर्णी ता.यावल यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज