जळगाव दुचाकी चोरीचे सत्र थांबेना, तरुणाची दुचाकी लांबविली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण काही केल्या थांबत नाहीय. दिवसेंदिवस दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच शहरातील रिंगरोड परिसरातून हात मजूरी करणाऱ्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

भरत राजू गवळी (वय-२३) रा. शनीपेठ, जळगाव हा तरूण हातमजूरीचे काम करतो. त्याच्याकडे (एमएच १९ सीएस ३९५४) क्रमांकाची दुचाकी आहे. १ डिसेंबर रोजी भरत गवळी हा दुचाकी घेवून शहरातील रिंगरोडवर असलेल्या यशोदाई मल्टिपर्पज हॉल जवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने आला होता. दुचाकी हॉल जवळ पार्किंगला लावली होती.

अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आली. परिसरात शोधाशोध केली दुचाकी मिळून न आल्याने अखेर शनिवारी ४ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar