रायफल शूटिंग स्पर्धेत जळगाव विजयी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । आंतरविभागीय रायफल व पिस्तोल शूटिंग स्पर्धा मू.जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य शूटिंग रेंज पार पडल्या.ही स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव विभागाच्या संघाने विजेतेपद पटकावले.या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार आणि एरंडोल या चार विभागांच्या ३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

सहभाग स्पर्धेचे उद्घाटन केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील व विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव दिलीप गवळी जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव प्रशांत जगताप.प्रा.डॉ.सी. पी.लभाणे, जिल्हा रायफल असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रा.वाय.ए.सैंदाणे, जळगाव क्रीडा विभागाचे सचिव प्रा. चंद्रकांत डोंगरे, क्रीडा संचालक प्रा.डॉ.एल.के.प्रताळे उपस्थित होते.

निवड समिती सदस्य म्हणून प्रा.डॉ.के.जी.बोरसे यांनी काम पहिले पंच म्हणून किरण पाटील, सागर सोनवणे यांनी काम पहिले. तांत्रिक अधिकारी म्हणून दीक्षांत जाधव यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -