कबचौउमविचे प्रभारी कुलसचिव भादलीकर यांचा अखेर राजीनामा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भादलीकर हे कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती वरिष्ठ पातळीवर न मागता पोहचवल्याने गोत्यात आले होते. यामुळे शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती आवश्यकता नसतांना व लेखी स्वरुपात कुठलीही मागणी नसतांना विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी सुयश दुसाणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांना लेखीस्वरुपात पाठवली आहे. यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याने कर्मचारी कृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला. याबाबत प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्‍वासन देऊनही कारवाई करण्यात आली नाही.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन केले. कालच्या आंदोलनानंतर प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांनी या प्रकरणी कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. या अनुषंगाने आज प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यामुळे कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, भादलीकर यांच्या जागी डॉ. ए. बी. चौधरी हे प्रभारी कुलसचिव बनणार आहेत. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -