fbpx

जळगावात चोरट्यांनी चक्क अडीच लाख रुपये असलेलीच तिजोरी पळविली

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । जळगाव शहरात दिवसेंदिवस चोरी घरफोडीच्या घटना वाढत असून आज मंगळवारी चोरट्यांनी चक्क जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेतील अडीच लाख रूपये असणारी  तिजोरीच पळवून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना याबाबात सिसीटीव्ही फुटेज मिळाले असून चोरांच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत असे की, जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी असून यामुळे संस्थेत बर्‍याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. याच अनुषंगाने आज मंगळवारी पहाटे संस्थेत चार चोरांनी प्रवेश केला. चोरांनी तोडाला रूमाल बांधलेले होते. त्यांनी मुख्य दरवाजाचे लॉक तोडून प्रवेश केला. तसेच कार्यालयातील सिसिटीव्हीचे देखील चोरांनी तोडले. 

दरम्यान, यावेळी चोरट्यांनी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला परंतू तिजोरी उघडता येत नसल्याने चोरांनी तिजोरी सरकवत ती बाहेर आणून ती गाडीत टाकून चोरून नेली. त्यात अडीच लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी कार्यालयात कर्मचारी आले असता त्यांना दरवाजाचे लॉक तुटलेले आढळून आले. त्यांनी त्वरीत आत जावून पाहता तिजोरी नसल्याचे वरिष्टांना कळवील्यानंतर घटना उघडकीस आली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येवून पाहणी केली. तसेच पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे देखील यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. तसेच चौकशी बाबत पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. कार्यालय व परिसरातील अकरा सिसिटीव्हीचे फुटेज पोलिसांना मिळाले असून त्या द्वारे पोलिस तपासकरत आहे. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज