एसटी प्रवास महागला ; जळगावातून भुसावळ, पाचोरा, चाळीसगावसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ ।  इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर चांगलाच भार पडला आहे. हा भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. दिवाळीच्या ताेंडावर एसटीने १७.१७ टक्के भाडेवाढ केली आहे. जळगाव येथून एरंडाेल, जामनेर,चाेपडा,भुसावळ एसटीने प्रवास करण्यासाठी आता पूर्वीपेक्षा पाच ते दहा रुपये अधिक माेजावे लागतील.  तर नांदुरी गड व शिर्डीचा प्रवास तब्बल ५५ रुपयांनी महागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मासिक पास काढले आहेत त्यांचे शुल्क १ नाेव्हेंबरपासून वाढणार.

तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झालीये. मागील गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्याचा एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे.

ही दर वाढ २५ ऑक्टाेबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहे. तिकीट दरवाढीमुळे जळगाव ते भुसावळ प्रवास तब्बल ४० रुपयांवरून ५० रुपये झाला आहे. तर जळगाव ते धुळे १२० रुपयांवरून १४० रुपये झाला आहे. तसेच नाशिक प्रवास ३२० रुपयांवरून ३७५ रुपये झाला आहे. औरंगाबादसाठी २१० वरून २४५ मोजावे लागतील.जळगाव जिल्ह्याअंतर्गत प्रवास ५ रुपयांपासून ४० रुपयांपर्यत महागणार आहे.

रातराणीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा

महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. साधी-रात्रसेवा-जलद गाडी १० रुपये प्राैढांसाठी व मुलांसाठी ५ रुपये. निमआराम/विना वातानुकूलित / शयन / आसनी प्राैढ १५ रुपये, मुले ५ रुपये, शिवशाही (वातानुकूलित) प्रौढ १५, मुले १० रुपये, शिवशाही स्लीपर (वातानुकूलित) प्रौढ १५, मुले १० रुपये. वातानुकूलित शिवनेरी प्रौढ २०, मुले १० रुपये. वातानुकूलित शिवनेरी स्लीपर प्रौढ २५, मुले १५ रुपये.

शहर पूर्वीचे दर आणि नवीन

नाशिक ३२०- ३७५
औरंगाबाद २१० -२४५
पुणे ५०० -५८५
सोलापूर ५९५ -६९५
मुंबई ७४० -८६५

शहराचे नाव पूर्वीचे दर आणि नवीन दर 

चाळीसगाव १३० – १५०
रावेर १०० – ११५
मुक्ताईनगर ८५ – ९५
पाचोरा ७० – ८०
एरंडोल ४५ – ५५
जामनेर ५५ – ६०
चोपडा ७५ – ८०
अमळनेर ८५ – ९५
भुसावळ ४० – ५०
धुळे १२० – १४०
नांदुरी गड ३०५ – ३६०
शिर्डी ३०५ – ३६०

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज