fbpx

शासन आदेशाची प्रतिक्षा : दुकानांची वेळ ‘जैसे थे’

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । ज्या जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संसर्ग दर राज्याच्या दरापेक्षा कमी आहे अशा २५ जिल्ह्यांतील कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्याचे आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. २९) जाहीर केले होते. परंतु याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी असल्याने सोमवार ते शुक्रवार सर्व प्रकारची दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश राज्यातील २५ जिल्हाधिकाऱ्यांना अद्यापही मिळालेले नाहीत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात २६ जूनपासून ‘डेल्टा पल्स’ व्हेरियंटचे निर्बंध लागू आहेत. त्यात सोमवार ते शुक्रवार सर्व प्रकारची दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू आहेत. तर शनिवार व रविवार दुकाने पूर्णपणे बंद ठेवावयाची आहेत. सोबतच शाळा, महाविद्यालय, उद्याने, चित्रपटगृह, प्रार्थनास्थळे बंदच आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर शुक्रवारपासून सर्व दुकाने सायंकाळी आठपर्यंत सुरू ठेवता येतील, अशी आशा व्यापारी बांधवांसह सर्वांनाच होती. मात्र जिल्हा प्रशासन निर्बंध शिथिल केल्याबाबतचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त न झाल्याने शनिवार, रविवार दोन दिवस दुकाने बंद ठेवावी लागतील.

असे असू शकतात नियम?

राज्यातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग दर कमी असल्यामुळे दुकाने, सलून, हॉटेल यांना रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात येवू शकते. व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना ५० टक्के क्षमतेने तर आठवड्यातील सध्याची शनिवार-रविवारची दोन दिवसांची दुकानांची टाळेबंदी एक दिवस केली जाऊ शकते. शनिवारी सायंकाळी ४ पर्यंत दुकानांना परवानगी देण्यात येईल. विवाह सोहळ्यांसाठी उपस्थितांना १०० पर्यंत मुभा तर सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम सध्या पूर्णपणे बंद असू शकतात. अशा कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येची मर्यादा घालून मुभा देण्यात येणार येवू शकते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज