जळगाव झाला गारेगार ; राज्यातील सर्वाधिक कमी नीचांकी तापमानाची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जळगाव पुन्हा एकदा गारेगार झाला असून, काल बुधवारी जळगावात राज्यातील सर्वाधिक कमी 11 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि थंडी असे विचित्र चित्र राहणार आहे. हवामान बदलाचा हा परिणाम आहे. चार दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकताे.

या थंडीचा हरभरा आणि गव्हाच्या पिकाला फायदा होणार आहे. मात्र, नागरिकांना कापरे भरत असल्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत.

गेल्या आठवड्यात अवकाळीचे संकट टळले असतांना येत्या शुक्रवारपासून उत्तर महाराष्ट्रावर पुन्हा ढगाळ वातावरण राहणार असून सावट आहे. शुक्रवार ते रविवार दरम्यान हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जाेरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ हाेऊन पारा १६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला हाेता. त्यात दाेन दिवसांमध्ये पुन्हा घट झाली आहे.

राज्यात काल बुधवारी नीचांकी तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली. तिथेही पारा 11 अंशापर्यंत घसरला, तर पुण्यात 11.8 तापमानाची नोंद करण्यात आली. आज गुरुवारी देखील हीच परिस्थिती राहणार आहे. एकीकडे थंडी वाढत असली तरी राज्यात अनेक भागात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज