⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावच्या प्राध्यापकाचा काश्मीरमध्ये मृत्यू

जळगावच्या प्राध्यापकाचा काश्मीरमध्ये मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 26 मे 2024 | मित्र परिवारासह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या जळगावच्या प्राध्यापकाचा बर्फाचा थर निखळून त्याखाली असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोनमर्ग येथे घडली. दीपक प्रल्हाद पाटील (४३, रा. फुपणी, ता. जळगाव) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. मयताचे काश्मिरातच शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह फुपणी येथे आणणार आहे.

याबाबत असे की, मूळचे जळगाव तालुक्यातील फुपणी येथील रहिवासी असलेले दीपक पाटील हे कल्याण येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे. ते पत्नी व मुलीसह कल्याण, धुळे येथील मित्र परिवार असे एकूण १४ जण काश्मिरात फिरायला गेले होते. शनिवारी संध्याकाळी ते सोनमर्ग येथे बर्फाच्छादीत परिसरात फिरत असताना अचानक बर्फ निखळला.

बर्फ निखळल्यानंतर पाटील दाम्पत्य नदीत कोसळले होते, मात्र यात पत्नीला वाचवण्यात यश आले आहे.ही घटना शनिवार, २५ में रोजी संध्याकाळी काश्मिरमधील सोनमर्ग येथे घडली. मयताचे काश्मिरातच शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह फुपणी येथे आणणार आहे.

दरम्यान, काश्मिरमध्ये पाटील यांचा मृत्यू झाल्याने नेमके काय करावे, हे सोबतच्या मंडळींना समजत नव्हते. त्यावेळी बॉर्डर लेस फाउंडेशनच्या माध्यमातून काश्मिर मध्ये आरोग्य सेवेचे काम केलेले जळगावातील डॉ. धर्मेंद्र पाटील यांना या विषयी माहिती मिळताच त्यांनी कंगन येथे सैन्य दलातील मेजर विशाल सागर यांच्याशी संपर्क साधून घटना कळविली. त्यावेळी सैन्य दलातील मंडळी मदतीसाठी धावले व त्यांनी सर्व वैद्यकीय व अन्य मदत करत मृतदेह श्रीनगरपर्यंत पोहोचविला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.