रोकड, दागिने घेऊन पळालेले प्रेमीयुगल गोव्यात गवसले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । घरातील रोकड व सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या झालेल्या प्रेमीयुगलास अमळनेर पोलिसांनी गोवा येथून ताब्यात घेतले. मोईन शेख असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत असे की, २५ नोव्हेंबर रोजी मोईन शेख याने एका युवतीला तिच्या घरासमोरून फूस लावून पळवून नेले. प्रथम मुलगी हरवल्याची तक्रार पालकांनी केली होती. मात्र मोईन यानेच पळवून नेल्याची खात्री झाली आणि घरातील रोकड व सोन्याचे दागिनेही चोरीला गेल्याने मुलीचाही कटात सहभाग असल्याच्या शक्यतेवरून मुलीच्या आईने मोईन शेख, मुलगी व इतर तीन जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव यांनी विविध गटांच्या बैठका घेऊन तीन तपास पथके रवाना केली.

मुलाच्या संपर्कात आलेल्या सर्व तरुणांची चौकशी करण्यात आली. इकडे शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांवर दडपण येत होते. अखेर पोलिस निरीक्षक हिरे यांच्या गोपनीय माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील यांनी मोईनला शोधण्यासाठी भिवंडी गाठली. मात्र तेथून तो गोव्याला पळाल्याचे समजताच त्यांनी गोवा गाठून दोघांना अमळनेरला आणले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -