fbpx

मुख्यमंत्री महोदय आम्हाला वाचवा : जळगावच्या व्यापाऱ्यांचे साकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । कोरोनामुळे गेल्या १५ महिन्यांपासून लॉकडाऊन आणि निर्बंधांचे पालन करणाऱ्या व्यापारी बांधवांची सहनशीलता आता संपली असून जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना साकडे घालण्यात आले आहे. जळगावात दोघांचे लक्ष वेधणारे तब्बल ५०० पोस्टर लावण्यात आले असून सोशल मीडियात देखील ते व्हायरल केले जात आहे.

जळगाव शहरात “मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आम्हाला वाचवा” नॉन इसेंशियल व्यापाऱ्यांना समजून घ्या, आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या असे संदेश असलेले पोस्टर जागोजागी लावण्यात आले आहे.

mi advt

कोरोना आणि लॉकडाऊन काळात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची उदरनिर्वाहासाठी वाताहत होत असून व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे. प्रशासनाकडून गोर-गरिबांना मदत जाहीर केली जात असली तरी व्यापाऱ्यांना मात्र कसलीही सवलत देण्यात आलेली नाही. कोणताही कर शासनाने माफ केला नसून त्याचा भुर्दंड शासनाला सहन करावा लागत आहे.

img 20210511 wa0070

५०० पोस्टरद्वारे भावनिक साद

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे संपूर्ण शहरात ५०० पोस्टर लावण्यात आले आहे. पोस्टरमध्ये मा.मुख्यमंत्री महोदय व्यापाऱ्यांनी दुकानाचे भाडे कसे भरायचे? बँकेचे हफ्ते कसे भरायचे? पगार कुठून द्यायचे? खायचं कसे ? आणि जगायचे कसे ? गव्हर्नमेंट टॅक्स, लाईट बिल, टेलिफोन बिल, घरपट्टी भरायची कुठून असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. पंधरा महिन्यापासून आम्ही सहकार्य करीत आहोत आता मात्र आम्ही हतबल झालो आहोत. पालकमंत्री मंत्री महोदय तुम्ही आमचे पालक आहात कृपया आमच्या वाढत असलेल्या अडचणी समजून घ्या, आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज