fbpx

अग्निशमन सैनिक दिनानिमित्त कर्मचार्‍यांचा महापौरांकडून सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । कोणत्याही आपत्ती निवारणप्रसंगी अतिशय धैर्याने व प्रशिक्षणाने आगीपासून जीव व मालमत्ता वाचविणारे तसेच यापासून होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे अग्निशमन सेवेचे सेवेकरी हे खर्‍या अर्थाने ‘सैनिक’च असतात. त्या अनुषंगाने शहरातील वाढत्या नागरी वस्त्यांचे क्षेत्र लक्षात घेता पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल, असे आश्वासन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज दिले. यासाठी मनपा मध्ये ठराव मंजूर केला गेला असून त्यावर प्रशासकीय मान्यतेचे काम सुरू असल्याचे देखील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले

जागतिक अग्निशमन सैनिक दिनानिमित्त गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यातील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या केंद्रात जाऊन केंद्रप्रमुख शशी बारी यांच्यासह विश्वजित गरडे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील हेही यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

mi advt

महापौर जयश्री महाजन यांनी सुरूवातीला अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांप्रती ते देत असलेल्या उत्तम सेवेबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांच्या विविध सेवा-सुविधा देताना येणार्‍या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी कर्मचार्‍यांनी सद्यःस्थितीत या केंद्राकडे जुन्या 3 व नव्या 4 अशा एकूण 7 फायर फायटर गाड्या उपलब्ध असून, एक गाडी बंदावस्थेत आहे. सध्याची असलेली जागा केंद्रासाठी अपूर्ण पडत असल्याचे सांगत नव्या जागेत या केंद्राचे स्थलांतर केले जावे, अशी मागणी केली. तसेच उपकरण खरेदीसंदर्भातही चर्चा केली.

त्यानंतर  महापौर महाजन म्हणाल्या, की शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन तुमच्यावरील कामाचा ताण कमी करण्याच्या अनुषंगाने पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल. उपकरण खरेदीचा विषय या महिनाअखेर सोडविला जाईल. त्यासाठी 50 लाखांपर्यंत तरतूद केलेली आहे.उन्मेष पाटील व आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या उपस्थितीत एमआयडीसी अधिकार्‍यांसमवेत डिसेंबर 2020 मध्ये बैठक झाली होती, त्यात एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे केंद्र एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय होऊन ते त्यांच्याकडे कार्यान्वित झाले आहे. तुमच्या केंद्रासाठी नव्या जागेचा शोध सुरू आहे, हा प्रश्नही लवकर निकाली काढला जाईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज