fbpx

राष्ट्रवादीची मुंबईत उद्या महत्त्वपूर्ण बैठक, नवीन जिल्हाध्यक्ष निवडीची शक्यता

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । जिल्हा राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. जळगाव जिल्हा अध्यक्षपदी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर तर महानगराध्यक्ष म्हणून अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. गुलाबराव देवकर व अशोक लाडवंजारी समर्थकांसह मुंबई रवाना झाले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले होते. राष्ट्रवादीत सध्या असलेल्या कार्यकारिणीत अनेक नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून रंगत आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांची जिल्हाध्यक्षपदी तर खडसेंचे यांचे खंदे समर्थक अशोक लाडवंजारी यांची महानगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मुंबई येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून त्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि अशोक लाडवंजारी हे समर्थक व कार्यकर्त्यांसह मुंबई येथे बैठकीसाठी रवाना झाले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt