सराफ दुकान फोडणारा अट्टल गुन्हेगार जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील नंदुरबारकर सराफ या दुकानात डल्ला मारणाऱ्या मोनुसिंग बावरी या अट्टल गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथून शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. एलसीबीने यापुर्वीच भारतसिंग आयासिंग भाटीया (रा.सतवास जिल्हा देवास मध्यप्रदेश) यास अटक होती.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. अशोक जाधव, माधव गोरेवाल यांच्या पथकाने मोनुसिंग बावरी यास अटक केली आहे. त्याला पो.नि. प्रताप शिकारे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. तो त्याच्या साथीदारांसह मुक्ताईनगर तालुक्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मोनुसिंग अट्टल गुन्हेगार
मोनुसिंग याच्यावर यापुर्वी १५ गुन्हे दाखल आहेत. तो अट्टल घरफोड्या करणारा गुन्हेगार असून एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संपूर्ण रात्र मुक्ताईनगर तालुका पिंजून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. उद्या दि.७ नोव्हेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्याकडून विविध घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्यात यापुर्वी अटक करण्यात आलेल्या भारतसिंग भाटीया यास स.पो.नि. प्रमोद कठोरे व किरण पाटील हे मध्यप्रदेशातील सतवास येथे तपासकामी घेऊन गेले होते. तेथून चोरीची चांदी हस्तगत करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज