fbpx

मनपातील लिफ्ट पुन्हा बंद, नियम मोडत नागरिकांची गर्दी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । शहर मनपातील लिफ्टचे ग्रहण अद्यापही पूर्णपणे सुटले नसून गुरुवारी मनपातील तीन लिफ्ट बंद असल्याचा प्रत्यय आला. ३ लिफ्ट बंद होत्या तर इतर एक लिफ्ट राखीव असल्याने इतर दोन लिफ्टवर नागरिकांची गर्दी पहावयास मिळाली.

महानगरपालिका शिस्त लावण्यासाठी नागरिकांवर दंडात्मक कारवाई करते. मात्र आज मनपात एकच गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले.  महानगरपालिकेमधील सहापैकी तीन लिफ्ट या पूर्णपणे बंद होत्या आणि एक लिफ्ट ही पालिकेतील कर्मचारी आणि इतर व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आली होती. यावळे इतर दोन लिफ्ट मध्ये एकच गर्दी पाहायला मिळाली.

जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी होत असला तरी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासन जंगजंग पछाडत आहे. यासाठी नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. कोणीही नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कित्येक वेळेस ४ वाजेनंतर कोणतेही दुकान उघडे असेल तर त्या दुकानाला सील देखील लावण्यात येत आहे. इतके सगळे असले तरी ज्याप्रकारे दिव्याखाली अंधार असतो त्याचप्रकारे महानगरपालिकेची स्थिती झाली आहे. गुरुवारी महानगरपालिकेतील सहापैकी तीन लिफ्ट या बंद होत्या व एक क्लिप ही मनपा कर्मचारी, आयुक्त व नगरसेवकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. यामुळे इतर दोन लिफ्ट मध्ये प्रवेश मिळण्यासाठी नागरिकांची एकच दमछाक उडाली. मनपात अनेक कर्मचारी व लिफ्टमन असतानाही कुणीही नागरिकांना नियम सांगितला नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज