मनपा उद्या करणार शहरातील व्यापारी संकुलांची स्वच्छता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी झालेली आहे. त्यानुसार मनपाकडून शहरातील ठिकठिकाणी उद्या रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

“स्वच्छता संकल्प देश का हर रविवार विशेष सा” या मोहिमे अंतर्गत दि.१ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी मनपातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभागाने स्वच्छता मोहिमेनुसार ‘गंदगी से आजादी’ राबविली.

या भागात स्वच्छता करण्यात आली

या मोहिमे अंतर्गत सतरा मजली प्रशासकीय इमारत, प्रभाग कार्यालय, हेल्थ पोस्ट, युनिट ऑफिस, शाहू हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, फुले मार्केट, बहिणाबाई उद्यान, शाळा क्रमांक ३, कालिंका माता चौक, नेरी नाका स्मशान भूमी अजिंठा चौफुली, साईबाबा मंदिर, नमस्कार प्लायवूड, सिंधी कॉलनी बाजार पट्टा, नवीन बस स्थानक परिसर, सोमानी मार्केट चौक पिंप्राळा, स्मशानभूमी पिंप्राळा, गजानन महाराज मंदिर जवळ, गिरणा टाकी चौक, मायादेवी नगर मेन गेट जवळ, शिवाजी नगर स्मशानभूमीत, पांडे चौक, रिधूर वाडा, रेणुका माता मंदिर चौक ते डी मार्ट, हरिविठ्ठल नगर बाजार पट्टा, खोटे नगर बस स्टॉप ते चंदू अण्णा नगर, बाजार परिसर, काव्यरत्नावली चौक, अजिंठा चौफुली या भागात श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली आहे.

रविवारी या ठिकाणी राबविणार स्वच्छता मोहीम?

आयुक्त तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार जळगाव शहरातील गोलाणी मार्केट, महात्मा फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने बी. जे मार्केट, नवीन बी. जे मार्केट, नारखेडे धर्मशाळा मार्केट, शिवाजी नगर मार्केट, गेंदालाल मिल मार्केट, मीनाताई ठाकरे मार्केट, सोमानी मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, छत्रपती शाहू मार्केट जुने, डॉ. आंबेडकर मार्केट, भास्कर मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती या व्यापारी संकुलांमध्ये स्वच्छतेची मोहीम, मनपाचे अधिकारी / कर्मचारी श्रमदानातून उद्या रविवार रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत स्वच्छता करणार आहे.

मनपाचे अधिकारी कर्मचारी आरोग्य विभागाचे कामगारांसोबतच सर्व व्यापारी, फेरीवाले, नागरिक, स्वयंसेवी संस्था, पदाधिकारी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून गंदगी से आजादी. या मोहिमे अंतर्गत स्वच्छ जळगाव सुंदर जळगाव या मोहिमेत सहभागी व्हावे. ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक रविवार विशेष स्वरूपात स्वच्छतेचा संकल्प करून साजरा करायचा आहे. या अंतर्गत घरेलू हानिकारक कचरा एकत्र टाकल्यामुळे त्याचा पर्यावरण व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम बाबत प्रत्येक प्रभागात मनपात मार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी घरेलु हानिकारक सॅनिटरी पॅड्स, डायपर, केमिकल्सचे बॉटल्स इत्यादी, घरेलु हानिकारक कचरा कागदाच्या स्वतंत्र पाकिटामध्ये टाकून त्यावर लाल रंगाचे वर्तुळ काढुन घंटागाडीत असलेल्या डब्यामध्ये स्वतंत्ररीत्या देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे.

या करिता जशमनपाने सर्व घंटागाड्यामध्ये लाल रंगाची लाल रंगाच्या मोठी डस्टबिन घरेलू हानिकारकर कचऱ्याच्या स्वतंत्र संकलनासाठी बसविण्यात आले आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने मनपामार्फत प्रक्रिया केली जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar