जळगाव महापालिका ‘या’ ४ दिवशी राहणार बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । दिवाळीत जळगाव महानगरपालिका चार दिवस बंद राहणार आहेत. यंदा दिवाळीच्या दिवसात महापालिकेला ४ व ५ ऑक्टाेबर राेजी सुटी आहे. तर ६ व ७ राेजी शनिवार तसेच रविवारची सुटी आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात महापालिकेचे कामकाज चार दिवस बंद राहणार आहे.

यादरम्यान साफसफाईच्या कामावर काेणताही परिणाम हाेणार नाही याचे नियाेजन केले आहे. दरम्यान, महापालिकेशी निगडित काही कामे करायची असल्यास नागरिकांनी ती साेमवार ते बुधवारदरम्यान पूर्ण करून गैरसाेय टाळता येणार आहे.

आराेग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे कायम सफाई कर्मचाऱ्यांची विभागणी करून सुटीचा लाभ दिला जात आहे. दिवाळीत २० टक्के सफाई कर्मचाऱ्यांचे सुटीचे नियाेजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज