आता आठवड्यातून पाच दिवस सुरु राहणार जळगाव-मुंबई विमान सेवा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज ।१४ जानेवारी २०२२ । जळगावकरांसाठी एक खुशखबर आहे. कारण येत्या सोमवारपासून (१७ जानेवारी) जळगाव विमानतळावरून दिल्या जाणाऱ्या विमानसेवेत मोठे बदल करण्यात येत आहेत. १७ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार अश्या आठवड्याच्या पाच वर्किंग दिवसांत अवघ्या सव्वा तासात जळगावातून मुंबईत सकाळी ११ वाजता विमानाने पोहोचता येणार आहे. त्याचसोबत तीन दिवस कोल्हापूर आणि दोन दिवस नांदेड या दोन शहरांशी नव्याने जळगाव एअर कनेक्ट होणार आहे. शहरवासीयांसाठी ही नव्या वर्षांतील भेट ठरणार आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी ट्रुजेटतर्फे जळगाव ते मुंबई अशी विमान सेवा सुरू झाली होती. सध्या जळगावातून मुंबईसाठी तीन दिवस सेवा सुरु होती. ती आता सोमवार ते शुक्रवार या पाच वर्किंग दिवसांसाठी विमानसेवा असणार आहे. दुपारी उशिराने मुंबईत पोहोचण्याऐवजी सकाळी अगदी ११ वाजता मुंबईत दाखल होणे शक्य होणार आहे. अहमदाबाद,मुंबई शिवाय कोल्हापूर व नांदेड या दोन शहरांना जळगाव विमानसेवेने जोडले जाईल.

तसेच मंगळवार व गुरुवार नांदेडला विमानाने जाता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी अहमदाबादहून जळगावात सकाळी ९.३० वाजता विमान येऊन ते ९.५० वाजता मुंबईसाठी रवाना होईल. तेथे ११ वाजता पोहोचल्यानंतर ११.४० वाजता ते नांदेडसाठी उड्डाण करेल. मुंबई-नांदेड या फेरीसाठी विमान तिकीट सुमारे २५०० ते ३००० असेल. दरम्यान या सेवेचा लोकप्रतिनिधी, मंत्रालयात जाणारे शासकीय अधिकारी व उद्योजक यांना याचा अधिक फायदा होणार आहे. अर्थातच त्यामुळे या विमानसेवेला प्रतिसाद अधिक मिळू शकतो.

कोल्हापूरसाठी तीन दिवस सेवा
सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवसांसाठी अहमदाबादहून विमान निघून सकाळी ९.३० वाजता जळगावात दाखल होईल आणि ९.५० वाजता मुंबईला उड्डाण करेल. तेथे ते ११ वाजता पोहोचून ११.४० वाजता ते कोल्हापूरसाठी रवाना होईल. जळगाव ते मुंबईसाठी आरसीएस सेवा अंतर्गत २२९९ रुपये अधिक कर एवढे तिकीट लागेल. तर मुंबई ते काेल्हापूरसाठी ३ हजारांपर्यंत तिकीट लागू शकणार आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -