जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । दरवर्षीपेक्षा यावेळी नैऋत्य मान्सून केरळात खूपच लवकर दाखल झाला. महाराष्ट्रातही मान्सूनने जोरदार एंट्री मारत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढलं. यामुळे नदी नाल्यांना मे महिन्यातच पूर आल्याचं चित्र दिसून आले. मात्र आता वेगाने आलेला मान्सून मंदावला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि विदर्भात लवकर आगमन केले असले तरी जळगाव जिल्ह्यासाठी मात्र त्याची प्रतीक्षा आहे. जळगावात मान्सूनची कधी एंट्री होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांना आहे. यातच हवामान विभागाने जळगावच्या मान्सूनबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.

हवामान अंदाजानुसार, जळगाव शहरासह जिल्ह्यात मान्सूनचे आगमन १० ते १२ दिवसांनी लांबणीवर पडले आहे. साधारणतः १२ ते १५ जूनपर्यंत मान्सून जिल्ह्यात सक्रिय होऊन दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचाही अंदाज आहे.
मान्सूनचा प्रवास सध्या मंदावला आहे. त्याची मुख्य कारणे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे कमकुवत होणे आणि बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली तयार होण्यास होणारा विलंब ही आहेत. वाऱ्यांच्यामान्सूनचा प्रवास सध्या मंदावला आहे. त्याची मुख्य कारणे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे कमकुवत होणे आणि बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली तयार होण्यास होणारा विलंब ही आहेत. वाऱ्यांच्या दिशेतील बदल आणि हवेच्या दाबातील अडथळ्यांमुळे मान्सूनची गती थंडावली आहे. अरबी समुद्रात सध्या १०१० हेक्टोपास्कल तर महाराष्ट्रात १००० हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब असल्याने मान्सूनच्या वाऱ्यांना अंतर्गत भागात पुढे सरकण्यास अडचण आहे.
मे महिन्यात ७० मिमी पाऊस…
जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाचे सावट राहिले. जिल्ह्यात अधूनमधून वादळी पाऊस झाला. खरंतर मे महिण्यात २० ते ३० मिमी पाऊस होण्याची शक्यता असते. मात्र, यंदा मे महिन्यात तब्बल ७० मिमी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा दुप्पटचा पाऊस मे महिन्यात झाला आहे. पावसाच्या सावटामुळे यंदा मे महिन्यात बहुतांश दिवस तापमान हे चाळीशी खाली राहिले.
तापमान पुन्हा चाळिशीकडे
शहराचे तापमान शुक्रवारी (३० मे) ३८.२ अंशांवर होते. दरम्यान, आज ३१ मेपासून पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र वादळी पावसाची शक्यता कमी आहे. तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. किमान महिनाभर उकाडा सहन करावा लागू शकतो असा अंदाज आहे.
आगामी पाच दिवस असं राहील हवामान?
दिनांक.. तापमान… वातावरणाची स्थिती
३१ मे : तापमान- ३७ अंश…. ढगाळ वातावरण कायम राहील
१ जून : तापमान- ३६ अंश….ढगाळ वातावरण व काही प्रमाणात तुरळक पाऊस
२ जून : तापमान- ३५ अंश….ढगाळ वातावरण व काही प्रमाणात तुरळक पाऊस
३ जून : तापमान- ३६ अंश….ढगाळ वातावरण कायम राहील
४ जून : तापमान- ३६ अंश….ढगाळ वातावरण व काही प्रमाणात तुरळक पाऊस
I Need in Jalgaon live News Website. It is Specific Special for live Jalgaon News. I take all needed news, I like All Website with link. Full my Type Website.Good For Jalgaon District Region and People who need. Thank you for News.