शहरातील कुत्रे निर्बिजीकरणासाठी मनपा मोजणार प्रतिश्वान ९३८ रुपये!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अवघ्या २० दिवसात १९८ नागरिकांना कुत्रे चावा घेतल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह प्रसिद्ध केले होते. वृत्ताच्या अनुषंगाने याबाबत अधिक माहिती घेतली असता जळगाव महापालिकेने प्रसिद्ध केलेली निविदा अंतिम टप्प्यात आली असून नंदुरबार येथील एका संस्थेला कुत्रे निर्बिजीकरणासाठी प्रति श्वान ९३८ रुपये प्रमाणे काम देण्यात आले आहे. १ ऑगस्टपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

जळगाव शहरामध्ये कुत्र्यांनी उच्छाद मांडला असल्याचे वृत्त जळगाव लाईव्हने नुकतेच दिले होते. शहरात महिनाभरात २०० पेक्षा अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यावर कायमचा उपाय काढण्यासाठी येत्या १ ऑगस्टपासून या सर्व कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

जळगाव शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नंदुरबारमधील एका समाजसेवी संस्थेला प्रति श्वान ९३८ रुपये प्रमाणे हा मक्ता देण्यात आला आहे, असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -