महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त माल्यार्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी असल्याने शिवतीर्थ मैदान येथे महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. प्रसंगी अपर आयुक्त आयुक्त विद्या गायकवाड, कार्यालय अधीक्षक राजेंद्र पाटील, राजेंद्र सुलाखे आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज