fbpx

जळगावचे महापौर व उपमहापौरांनी घेतली शिवसेना नेते खा.राऊतांची भेट

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । जळगावच्या महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, यावेळी जळगाव शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच संजय राऊत यांना  जळगावला येण्याचे आमंत्रण दिले.

काल सोमवारी महापौर आणि उपमहापौर यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जळगावचे संपर्कप्रमुख संजय  सावंत व रावेर क्षेत्राचे संपर्कप्रमुख विलासजी पारकर व सुनिल महाजन हे उपस्थित होते.

दरम्यान, जळगाव महापालिकेत भाजपच्या 27 बंडखोरांच्या माध्यमातून शिवसेनेने सत्ता आपल्या हाती घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील पून्हा काही नगरसेवक फोडाफोडीची रणनिती सुरु आहे. तीन-चार दिवसांपुर्वी भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले आहे. आणखी सात ते दहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून उपमहापौर कुलभूषण पाटील हे मुंबईत ठाण मांडून आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज