fbpx

JCMC जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती

जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : २४

mi advt

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०८
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी

२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी/ Part Time Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी, पेडियाट्रिशियन, जनरल फिजीशियन

३) एएनएम/ ANM ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) एएनएम कोर्ससह १० वी पास एमएनसी नोंदणी आवश्यक आहे. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

४) स्टाफ नर्स/ Staff Nurse ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एससी. / जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक.

५) फार्मासिस्ट/ Pharmacist ०२
शैक्षणिक पात्रता : डी.फार्म / बी.फार्म.

६) जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग)/ District Pharmacist (NTEP Department) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून फार्मसी मध्ये पदवी / पदविका ०१) ०१ वर्षे अनुभव.

७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician ०३
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी., डीएमएलटी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

८) गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक/ Quality Programme Assistant ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT

९) लेखापाल/ Accountant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉमर्स मध्ये पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

१०) क्षयरोग आरोग्य विझिटर/ Tuberculosis Health Visitor ०१
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयात पदवीधर

 वयो मर्यादा : या भरती साठी उमेदवाराचे वय ३८ ते ६५ वर्षे पर्यंत असावे.

परीक्षा फी :  १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]

वेतन : १५,००० ते ६०,००० /- रुपये (पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.)

अर्ज कसा करावा?
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पहिला मजला, कै. डी. बी  जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड – ४२५००१. शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय

अर्ज पोस्ट, स्पीड पोस्ट, किंवा कुरियर ने विहीत मुदतीत प्राप्त झाले तरच त्या अर्जाचा विचार करण्यात येईल. कोरोना १९ विषाणु प्रादुर्भाव लक्षात घेता अर्ज इतरत्र माध्यमाने किंवा बायहॅन्ड स्विकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी

Official Site : www.jcmc.gov.in

जाहिरात Notification: PDF

सूचना :

– प्राप्त झालेल्या अर्जावरुन Qualifying Exam मध्ये मिळालेले गुण + उच्च शैक्षणिक अर्हता + शासकीय/निमशासकीय कार्यालयाचा अनुभव या बाबींचे गुणावरुन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मेरीट लिस्ट तयार करण्यात येऊन पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. (गुणांसंबंधी अधिकार निवड समितीने राखून ठेवले आहे) अंतिम मेरीटलिस्ट jcmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल

– वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असून प्रकल्प कालावधी पुरताच असल्याने प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील सदरील नेमणुक आपोआप संपुष्टात येईल. त्यासाठी १ महिन्याची नोटीस दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.

– निवड करण्यात येणारे उमेदवार पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावे तसेच निवड झालेल्या उमेदवाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला अथवा प्रलंबित नसावा. त्यासंदर्भातील मेडिकल सर्टिफिकेट मनपा दवाखाने येथुन चाचण्या करून झालेनंतर प्राप्त करुन घ्यावे व चारित्र्य पडताळणीबाबतचा अहवाल संबंधीत जिल्हयातील पोलिस स्टेशन येथे अर्ज करून प्राप्त करून घेतलेनंतरच नियुक्ती देण्यात येईल

– उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. जर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास किंवा कागदपत्रे जोडलेली नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज