जळगावच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची बदली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज । २३ ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यातील जिल्हापरिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी बी. जे. पाटील यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे माध्यमिक  शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांची प्रशासकीय कारणास्तव अहमदनगर येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. शासनाने सोमवारी याबाबतचे आदेश पारित केले आहे.

दरम्यान, मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेबाबत असलेल्या एका प्रकरणावरून ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना दिनांक ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात सुनावणी आयोजित करण्यात आली होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -