जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : कावडिया पुन्हा झाले शिवसैनिक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । शहर मनपामध्ये शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून विराज कावडीया यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यांची निवड झालेली नव्हती. विराज कावडीया यांनी स्वतःच्या फेसबुकवर नगरसेवक पदाचे लेबल लावले असल्याचे वृत्त जळगाव लाईव्हने सकाळीच प्रसिद्ध केले होते. बातमीचा परिणाम म्हणून कावडिया यांनी आपल्या पुढील नगरसेवक पदाचे लेबल काढून केवळ शिवसैनिक म्हणून ओळख कायम ठेवली आहे.

शहर मनपात शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक असलेले अमर जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्तच आहे. शिवसेनेच्या कोट्यात एकच पद असून त्यासाठी जवळपास ८ लोक इच्छुक होते. जुन्या आणि जेष्ठांना बाजूला सारत पक्षाने नवीन चेहऱ्याला संधी देत विराज कावडिया यांचे नाव निश्चित केले होते.

काही दिवसांपूर्वी पक्षाने विराज कावडिया यांच्या नावाची घोषणा केली असली तरी यासंदर्भात महासभेत कोणताही निर्णय झाला नाही. कावडिया यांची नगरसेवक म्हणून निवड झालेली नसतानाही त्यांनी फेसबुकवर नगरसेवक म्हणून ओळख दिली होती. जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत बुधवारी सकाळी वृत्त प्रसारित केले होते. वृत्ताची दखल घेत कावडिया यांनी तात्काळ नगरसेवक ही ओळख पुसली असून शिवसैनिक म्हणून ओळख दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -