fbpx

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : सुकळीचे ग्रामसेवक झाले हजर

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी येथील उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांच्या ग्रामसेवक गैरहजेरीबाबत असलेल्या तक्रारी व वास्तविकता जाणुन घेत “जळगांव लाईव्ह” ने काल दि.१९ रोजी “ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे वनव्यवस्थापन समितीची पुनर्रचना स्थगित..!” या मथळ्याखाली खळबळजनक वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत ग्रामसेवक योगेश घाटे आज दि.२० रोजी ग्राम पंचायतीस हजर होऊन अनेक ग्रामस्थांच्या कागपत्राविषयक समस्या सोडविल्या.

“जळगांव लाईव्ह”च्या बातमीमुळे समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्रामसेवकांच्या गैरहजेरीबाबत उपसरपंच तथा ग्रा.सदस्य यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार होते. मात्र ग्रामसेवक यांनी हजेरी लावल्यामुळे तुर्तास तक्रार करणार नसल्याचे उपसरपंच नंदु नमायते व ग्राम पंचायत सदस्य यांनी “जळगांव लाईव्ह”च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज