fbpx

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : अखेर ‘त्या’ रस्त्याच्या कामाचे आजी-माजी महापौरांच्या हस्ते उदघाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील जुना असोदा रोड ते गोपाळपुरा आणि गोपाळपुरा ते जुना खेडी रोडची दुरवस्था आणि नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया गेल्या आठवड्यात जळगाव लाईव्ह न्यूजने समोर आणल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी तर लोकप्रतिनिधींना पायी चालून दाखविल्यास १००१ चे बक्षीस देखील जाहीर केले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत मंजूर २ कोटी निधीतून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. विद्यमान महापौर जयश्री महाजन व माजी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते जेसीबीची पूजा करून आणि नारळ वाढवून कामाचे उदघाटन झाले.

या परिसरातील रहिवाशांना लवकरच चांगला रस्ता उपलब्ध होणार असल्याची भावना महिला बालकल्याण सभापती रंजनाताई सपकाळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या भूमीपूजना प्रसंगी नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे नगरसेवक प्रवीण कोल्हे, दत्तू कोळी, नगरसेविका कांचनताई सोनवणे, मीनाक्षीताई पाटील यांच्यासह मनपा पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज