⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांचं टेन्शन वाढलं! सोन्याचा दर नव्या उच्चांकीवर, जळगावमधील आताचे भाव वाचा..

ग्राहकांचं टेन्शन वाढलं! सोन्याचा दर नव्या उच्चांकीवर, जळगावमधील आताचे भाव वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२४ । जागतिक घडामोडींमुळे देशात सोने-चांदीचे दर वाढतच चालले आहेत. एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७७ हजार रुपयाजवळ पोहोचला आहे. यामुळे आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं खरेदी करावं की नाही, हा प्रश्न पडतोय.

नवरात्रोत्सवातच सोन्याचा दर ८० हजार रुपयापर्यंतचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज यापूर्वी जाणकारांनी वर्तविला होता. आता तो खरा ठरताना दिसू लागत आहे. कारण मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसत आहे.

वाढत जाणाऱ्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजेच पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव. हा तणाव संपत नसल्यामुळे सोन्याच्या भावाला आधार मिळत असल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेपासून ते परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम विनाजीएसटी ७६८०० ते ७७००० रुपयांपर्यंत आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी, २२कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७०४०० रुपयांच्या पुढे गेला आहे. चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९४००० रुपये प्रति किलो आहे.

सोनं 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणीही वाढते. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे या सणासुदीतही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतील. या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळं सोनं ८०००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.