⁠ 
[rank_math_breadcrumb]

सोने-चांदीची नवीन विक्रमाला गवसणी; भाव वाचून ग्राहकांना फुटला घाम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२४ । भारतातील मोठ्या सणांपैकी सण म्हणजे दसरा, दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. यादरम्यान अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. मात्र ऐन सणासुदीत दोन्ही धातूंनी नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. भाव वाचून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा भाव विनाजीएसटी ७६ हजार रुपयावर गेला आहे. आज काय आहेत भाव जाणून घ्या..

खरंतर यूएस सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे, तेव्हापासून परदेशी बाजारातून भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील दोन आठवड्यापासून सोने दरात वाढ होताना दिसत आहे.

जळगावच्या सराफ बाजरात मागील आठ दिवसात सोने दराने प्रति तोळा तब्बल २३०० ते २४०० रुपयांहून अधिकची भरारी घेतली. काल गुरुवारी सोने दरात ५०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आज शुक्रवार सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विक्रमी ७६,६०० रुपये (विनाजीएसटी) प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे.तर जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७८९०० रुपयावर पोहोचले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे होत असलेली दर वाढ अशीच सुरूच राहिली तर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ८० हजार रुपयाचा टप्पा गाठू शकतो.

चांदीचा दर काय?
मागील काही दिवसात चांदी दराने देखील भरारी घेतली आहे. जळगावात मागील आठ दिवसात चांदी दरात ३००० हजाराहून अधिकची वाढ दिसून आली. सध्या चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९२५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर जीएसटीसह चांदीचा दर ९५३०० रुपयापर्यंत गेला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.