जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२४ । पितृपक्षात सोने आणि चांदी दराने पुन्हा उसळी घेतली. सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाल्याने प्रति तोळ्याचे दर ७६१०० तर जीएसटीसह सोन्याचा दर ७८३८३ रुपयांनी वाढून या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले.
चांदीच्या दरात एका दिवसात २ हजारांची वाढ होऊन ९२ हजारांवर (जीएसटीसह ९४७६०) स्थिरावली आहे. सोमवारी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर विनाजीएसटी ७५१०० होते. मात्र मागील दोन दिवसात सोने दरात पुन्हा हजार रुपयाची वाढ झाली. चांदी दरातही २ हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे.
पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?
पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.