जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२४ । दिवाळीत काळात सोन्याने ८० हजार रुपयांचा तर चांदीने १ लाखाचा टप्पा ओलांडला होता. दोन्ही धातुमधील उसळीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये बरीच घसरण झाली होती. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता सोन्यासह चांदीच्या भावात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोन्यासह चांदीचा भाव पुन्हा उच्चांकी दिशेने जात आहे.
जळगावात सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. गुरुवारी सोने ४०० रुपये प्रति तोळ्याने महागले आहे. यामुळे आज शुक्रवार सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८७०० रुपये (विनाजीएसटी) प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. दुसरीकडे काल चांदीचा दर १००० रुपयांनी वाढला असून आता एक किलो चांदीचा भाव (विनाजीएसटी) ९६००० रुपयावर पोहोचला आहे.
दोन्ही धातुनी या आठवड्यात दमदार बॅटिंग केल्याचे दिसते. गेल्या चार दिवसात सोन्याच्या भावात २१०० रुपये प्रति तोळा वाढ झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे चांदी ३ हजार रुपयांनी महागली आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने ७६,६०० रुपयावर तर चांदी ९३००० रुपये प्रति किलोवर होती.
जागतिक बाजारात सोने वधारण्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत आता दिसत आहे. या वर्षाअखेर आता सोने 85 हजारांचा टप्पा ओलांडते का? याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागेल आहे. अमेरिकेतली घडामोडींचा मोठा परिणाम बेशकिंमती धातुच्या दरवाढीवर होईल.