जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । मागील काही दिवसापासून सततच्या दरवाढीने सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला. ऐन सणासुदीत सोने महागल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली आहे. मात्र या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमती मोठी घसरण दिसून आली. सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली.
जळगावच्या सुवर्णपेठत बुधवारी सोन्याच्या किमतीत ६०० रुपयांची घसरण झाली. तर दुसरीकडे चांदी दरात तब्बल ३००० रुपयाची घसरण झाली. त्यामुळं खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.
काय आहे आज भाव?
जळगावात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५० रुपयांनी कमी होऊन ६८,९३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७५,२०० रुपये आहे. तसेच चांदीचा एक किलोचा दर ९०,००० रुपयावर पोहोचला आहे. या किमतीमध्ये जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.