fbpx

गोलाणीतील व्यावसायिकांनी केला प्रशासनाचा निषेध

mi-advt

प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाविरोधात शहरातील गोलाणी आणि फुले मार्केटमधील व्यापारी आक्रमक झाले असून गोलाणीतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध  केला आहे.

जिल्ह्याच्या सर्व व्यवसायिक, बाजारपेठासाठी दिलेली वागणूक अन्यायकारक आहे. आज व्यवसायिक व व्यवसायिकांच्या दुकानातील कामगार, हमाल, चहावाला, मालवाहतूकदार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. बँकांचे हप्ते व व्याज, कामगार पगार, कर , वीज बील हे सर्व थांबत नाही. 

व्यवसाय बंद ठेवण्यासाठी आमची सहमती नाही, ना आमचीशी चर्चा, प्रशासनाने बंदचा निर्णय का घेतला, एकतर्फी बंद का ठरवावा, व्यवसायसाठी जर अत्यावश्यक सेवेला योग्य वेळ मिळालेला आहे, तर मग आमच्यावर अन्याय का? असे प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केले आहे. प्रशासनाने व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या दीड लाख नागरिकांच्या शारीरिक व इतर हानीची जबाबदारी घ्यावी अन्यथा हे लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही, असेही व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

 

प्रशासनाने व्यवसायासाठी दुकान चालू ठेवण्यासाठी आदेश काढावा व लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा  अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा गोलाणीतील व्यापाऱ्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज