fbpx

बँकांमधील खाते गाळेधारक बंद करणार : डॉ. शांताराम सोनवणे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । महानगरपालिकेची थकबाकी न भरणार्‍या गाळेधारकांचे बँकेतील खाते गोठवण्याची प्रक्रिया  झाली आहे. त्यामुळे गाळेधारकांत संताप व्यक्त केला जातो आहे. पालिका व बँकांकडून चुकीचा प्रकार सुरू असून विश्वासात न घेता परस्पर कारवाई केली जात आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ पालिकेला सहकार्य करणार्‍या बँकांमधील खाते गाळेधारक बंद करणार असल्याची माहिती  संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली.

गाळेधारकांनी पैसे न भरल्याने पालिकेकडून  बँकांना पत्र पाठवून गाळेधारकांचे खाते सील करण्याची सुचना केली आहे. त्यानुसार बँकांकडून खाते गोठवणे सुरू आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारापर्यंत खाते सील झाल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे.

आधीच आर्थिक परिस्थिती नाजूक असताना कुटुंबाच्या अडीअडचणीसाठी थोडीफार जमापुंजी देखील  होणार असेल तर गाळेधारकांनी खायचे काय? असा सवाल डॉ. सोनवणे यांनी उपस्थित केला.  महापालिकेने बँकांना पत्र देवून खाते सील करण्यास सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज