आफळे शास्त्री, सिन्नरकर बुवांच्या कीर्तनाला गर्दी, सभा आणि बरेच काही..

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर जळगाव शहराने अनेक नवनवीन उपक्रम पहिले आणि राबविले देखील. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून जनमाणसांचे प्रबोधन करण्यासाठी भजन, कीर्तन, व्याख्यान आणि सभांचे आयोजन करण्यात येत होते. त्यावेळी राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या प्रबोधनकार महाराज मंडळींना जळगावात बोलाविले जात होते.

जळगाव जिल्ह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला फार मोठी परंपरा लाभली आहे. थोर नेत्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे डोळ्यासमोर ठेवलेले उद्देश जळगावात तंतोतंत कसे पाळले जातील याचे भान सर्वच गणेशोत्सव मंडळाकडून घेतले जात होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मेळे, सभा, व्याख्यान यासह सार्वजनिक उपक्रमांचे मोठ्याप्रमाणात आयोजन केले जात होते.

शहरात स्वातंत्र्यनंतरच्या काळात श्रीराम मित्र मंडळ, तरुण कुढापा मित्र मंडळ, दीपक मित्र मंडळ, नवीपेठ मित्र मंडळ, नटराज मित्र मंडळ, सराफ बाजार मित्र मंडळ यासह इतर देखील अनेक मंडळ सुरु झाले. जिल्ह्यातील काही गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे. काही मंडळात तर आज भाविक कार्यकर्त्यांची तिसरी पिढी गणरायाची भक्ती करीत आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात मनोरंजनाची फारशी साधने नव्हती. उद्याने, चित्रपट गृहे, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल अशा काहीही सुविधा नसल्याने रेडिओवरच मदार होते. गणेशोत्सवाचे औचित्य साधत भाविकांच्या मनोरंजनाचा आणि प्रबोधनाचा उद्देश समोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले. राष्ट्रीय कीर्तनकार प्रा.डॉ.श्रीकृष्ण बुवा सिन्नरकर, गोविंद बुवा आफळे जळगाव शहरात येऊन सभा, व्याख्याने घेत होते. बळीराम पेठ, जुने जळगाव परिसरात त्यांचे कार्यक्रम होत होते. भाविकांना देखील ते असत होते.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar