fbpx

अजिंठा चौफलीजवळ चारचाकींची समोरासमोर धडक ; दोघे जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । शहरातील अजिंठा चौफुलीकडून इच्छादेवीकडे जाणाऱ्या महामार्गावर लढ्ढा फार्म हाऊससमोर मध्यरात्रीच्या सुमारास २ चारचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन जण जखमी झाले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथील रहिवासी असलेले लोकेश धनाजी बेंडाळे वय ३८ हे ओपन करणारे मेहुणी रेणुका यांच्यासोबत चार चाकी (क्र.एमएच १४ जे १०७१) ने इच्छा देवी कडून अजिंठा चौफुली कडे जात होते. मध्यरात्री 11:55 च्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळील अंडा फार्म हाऊस जवळ समोरून भरधाव वेगात येत असलेल्या कार (क्र.एमएच-१९ ०९२४) वरील चालक सिद्धार्थ अर्जुन कांबळे राहणार गुजराल पेट्रोल पंप मागे जळगाव यांनी जोरदार धडक दिली.

mi advt

अपघातात लोकेश बेंडाळे व रेणुका हेमंत पाटील यांना किरकोळ दुखापत झाले. अपघातानंतर कारचालक कांबळे यांनी गाडीतून उतरून दारूच्या नशेत दोघांना शिवीगाळ केली याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार संजय भूमी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज