जळगाव जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांमध्ये केवळ ६ दिवसच पाऊस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । यंदा पावसाबाबत हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्थांचे अंदाज सपशेल फाेल ठरले आहेत. यंदा पावसाचे तीन महिने संपत आले तरी देखील जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट मात्र वाढती आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात केवळ १८ दिवस पर्जन्यमान हाेते. तर ऑगस्ट महिन्यात गेल्या २५ दिवसांमध्ये केवळ ६ दिवसच सरासरी पाऊस झालेला आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाची तूट ४० टक्क्यांवर हाेती. एकूण ३१ दिवसांपैकी १८ दिवस तुरळक दिवस पाऊस हाेता. तर इतर काेरडेच गेले. ऑगस्ट महिन्यात दाेन आठवडे पाऊसच नव्हता. गेल्या आठवड्यात ६ दिवस पाऊस झाला. आगस्ट महिन्यातील २५ पैकी अवघे ६ दिवस पाऊस झालेला आहे. पावसाच्या तुटीचे दिवस वाढल्याने त्याचा थेट खरिपाच्या पिकांवर आणि प्रकल्प साठ्यावर परिणाम झालेला आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा आता ४३ टक्क्यावर
जिल्ह्यात धरणसाठा आता ४३ टक्क्यावर पाेहाेचला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये ३८ टक्क्यांवर असलेला धरणसाठा ४३ टक्क्यांवर आला आहे. त्यात लघुप्रकल्पांमध्ये अवघा १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पात ६८ टक्के एवढा समाधानकारक साठा असून, माेठ्या प्रकल्पात ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ऑगस्ट महिन्यात सहा दिवसांमध्ये झालेल्या पर्जन्यमानामुळे धरणसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -