fbpx

३ जिवंत काडतूस गावठी कट्ट्यासह एकाला शहर पोलिसांनी पकडले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । शहरातील खान्देश सेंट्रल परिसरात गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस घेऊन दहशत माजविणाऱ्याला शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनूस सलीम पटेल उर्फ सद्दाम पटेल रा.गेंदालाल मील तरुण गावठी कट्टा घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे अक्रम शेख आणि भास्कर ठाकरे यांना बुधवारी रात्री मिळाली होती. दोघांनी त्याची गुप्त माहिती काढली असता तो शहरात फिरत असल्याचे कळले. दुपारीच्या सुमारास तो रेल्वे स्टेशनकडून खान्देश सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये आला असता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्रम शेख, भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, उमेश भांडरकर, किशोर निकुंभ, प्रणेश ठाकूर, गणेश पाटील, रतन गिते यांनी शिताफीने रिक्षात बसलेला असताना अटक केली.

पथकाने सद्दाम पटेल याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि ३ जिवंत काडतूस मिळून आला.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज