fbpx

५ दुचाकींसह २ चोरटे शहर पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । जळगाव शहर पोलिसांनी रावेर तालुक्यातून ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून तांबापुरातून दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. शाहरुख खाटीक (वय-२५, रा.तंबापूर) आणि फारुख शेख (वय-३२,रा. राजा कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.  

जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, रावेर तालुक्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना आज सोमवारी शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

mi advt

यांनी केली कारवाई

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्रम शेख, भास्कर ठाकरे, तेजस मराठे, योगेश इंधाटे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज