मंत्रालयाच्या माध्यमातून मेहरूण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मदत करणार ; वरूण सरदेसाई

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहराचे वैभव असलेला आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान असलेल्या मेहरूण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वातोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आज गुरुवारी जळगावात केलं

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई हे आज जिल्हा दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांच्या उपस्थितीत महापौरांनी मेहरूणमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी कोकणातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांकरिता पाच हजार वह्या पाठविण्यात आल्य. वरुण सरदेसाई यांची वहीतुला करून वह्या रवाना करण्यात आल्या.

याप्रसंगी सरदेसाई यांनी मेहरूण तलाव परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची माहिती जाणून घेतली. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी त्यांना याची माहिती दिली. यानंतर आर्कीटेक्ट शिरीष बर्वे यांनी या परिसराला चांगल्या पध्दतीत विकसित करणे शक्य असल्याचे प्रतिपादन करत याबाबतची इत्यंभूत माहिती दिली.

दरम्यान, ही माहिती जाणून घेतल्यानंतर वरूण सरदेसाई यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मेहरूण तलाव हे जळगावचे वैभव असून याचा विकास होणे गरजचे आहे. पर्यटन मंत्रालय हे आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याने या माध्यमातून तलाव परिसराचा विकास करता येणार आहे. यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन वरूण सरदेसाई यांनी याप्रसंगी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -