fbpx

जळगाव शहरात आज सर्वच लसीकरण केंद्र बंद

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । केंद्र सरकारने जाहिर केल्यानुसार 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू होणार होते. परंतु, त्याबाबत कोणताही आदेश, सूचना आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेल्या नाहीत. लसींचा साठाही उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यातही राज्य शासनाने 19 जून पासून राज्यात 30 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरु केले आहे. रविवारी त्यात चार हजार लाभार्थ्यांनी लस घेतली. शहरात लसींचा साठा संपला असल्याने मनपा, सिव्हीलच्या एकाही केंद्रावर आज सोमवारी लसीकरण होणार नाही.

जिल्ह्यात 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. रविवारी त्याचा दुसरा दिवस होता. दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात 4 हजार लाभार्थ्यांनी लस घेतली. जिल्ह्याला शनिवारी प्राप्त झालेल्या 19 हजार लसींच्या डोसपैकी 10 हजार डोस दोन दिवसात संपले.  

दरम्यान, केंद्र व राज्य सरकारमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे 21 जूनपासून 18 वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु होईल किंवा नाही याबाबतचा संभ्रम कायम आहे. त्याबाबत कुठल्या स्पष्ट लेखी सूचना आलेल्या नसल्याचे सूत्र सांगतात. परंतु, राज्य शासनाने 18 ते 44 या वयोगटाचे दोन टप्पे पाडले आहेत. त्यात 18 ते 29 व 30 ते 44 असे दोन टप्पे आहेत. त्यातील 30 ते 44 वयोगटाचे लसीकरण शनिवारपासून सुरु केले. त्याच्या लाभार्थींची संख्या ही जळगाव जिल्ह्यात 4 लाखांच्या घरात आहे. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज