fbpx

संकटमोचकांना पुन्हा धक्का, भाजपचे ३ नगरसेवक सेनेत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ ।  शिवसेनेने राज्यात करेक्ट कार्यक्रम मोहीम सुरू केली असून भाजपचे नगरसेवक गळाला लावत सेनेची सत्ता प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव मनपातील २७ भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शनिवारी पुन्हा तीन नगरसेवकांनी शिवबंधन बांधले आहे. जळगाव मुक्ताईनगर आणि पुन्हा जळगाव असे लागोपाठ तीन धक्के भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन यांना सेनेने दिले आहेत.

शुक्रवारी मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या ३ नगरसेवकांना सेनेने गळाला लावले आहे.

whatsapp image 2021 05 29 at 21.14.43 (1)

जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन सुरेश सोनवणे, शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ यांनी सेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव विनायक राऊत, संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, मोहन म्हसळकर, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या उपस्थितत नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज