fbpx

बीएचआर घोटाळ्यातील ११ संशयितांनी भरले न्यायालयात ‘इतके’ कोटी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ ।  बीएचआर घोटाळ्यातील दुसऱ्या अटक सत्रातील ११ संशयितांनी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले आहेत. या सर्वांना  ४० टक्के रकमेपैकी २० टक्के रक्कम १० दिवसांत जमा करण्याच्या अटींवर पुणे विशेष न्यायालयाने १४ जुलै रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. या अटींनुसार सर्वांनी पैसे भरले आहेत.

यांनी भरले इतके रुपये?

जयश्री तोतला (२९ लाख ३३ हजार ५९४ रुपये), अंबादास मानकापे (५४ लाख २३ हजार ३२८ रुपये), संजय तोतला (२० लाख ५८ हजार ७३४ रुपये), राजेश लोढा (२६ लाख २८ हजार९१२ रुपये), आसिफ तेली (२२ लाख ४२ हजार ४२५ रुपये), जयश्री मणियार (१७ लाख ९३ हजार ४१२ रुपये), प्रीतेश जैन (३० लाख २१ हजार ९९० रुपये), छगन झाल्टे (३४ लाख ३५ हजार ९९८ रुपये), जितेंद्र पाटील (१३ लाख ५१ हजार २९० रुपये), भागवत भंगाळे (२१ लाख ८ हजार), प्रेमनारायण कोकटा (४३ लाख २० हजार), असे सर्व संशयितांनी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt