कारचालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीला धडकली, चौघे जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । गाडीवरील ताबा सुटल्याने समोरून जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीला धडकल्याने झालेल्या अपघात कारमध्ये बसलेले जळगावचे तिघे आणि दुचाकीस्वार असे चौघे जखमी झाल्याची घटना जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर गणोरी फाट्याजवळ घडली.

याबाबत असे की, दुचाकीचालक प्रकाश जनार्दन शिंदे (रा.पळशी, ता. सिल्लोड), कारमधील मनोज अर्जुन माळी, युवराज ईश्वर परदेशी, उखर्डू रघुनाथ चव्‍हाण (सर्वजण रा. जळगाव) अशी कारमधील जखमी झालेल्यांची नावे आहेत. फुलंब्री-औरंगाबाद रस्त्याचे काम सुरू आहे. 

औरंगाबादकडून फुलंब्रीच्या दिशेने येणाऱ्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक देऊन कार पलटी झाली. यात दुचाकीस्वार व कारमधील पाच प्रवाशांपैकी तीन जण गंभीर जखमी झाले. 

सदरील अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले क्रीडा मंडळाची रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी जखमींना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या चारही जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -