fbpx

जळगावच्या खेळाडूंचे नॅशनल स्टुडंट्स ऑलम्पिक स्पर्धेत घवघवीत यश

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । रोहतक, हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या ७ व्या नॅशनल स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशन स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील राज्यस्तरीय विजेते संघ तसेच ऍथलेटिक्स खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

हरियाणातील रोहतक येथे १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान ७ व्या नॅशनल स्टुडंट्स ऑलम्पिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यस्तरावरील विजेते संघ तसेच ऍथलेटिक्स खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात कुस्ती स्पर्धेत धरणगाव येथील सौरभ पवार व महेश वाघ यांनी 2 गोल्ड मेडल, स्केटिंग स्पर्धेत जळगाव शहरातील यश चौधरी याने 1 गोल्ड मेडल, अथलेटिक्स स्पर्धेत सावदा येथील शुभम बाविस्कर याने 1 सिल्व्हर आणि अमळनेर येथील करण साळुंखे याने 1 गोल्ड मेडल प्राप्त केले. चोपडा येथील व्हॉलीबॉल संघाला मात्र तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. यावेळी जिल्ह्यातील सर्व संघासोबत जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या पाटील, जिल्हा सचिव योगेश चौधरी, जिल्हा सहसचिव मानसी भावसार आणि जिल्हा टीम मेंबर कोमल पाटील आदी उपस्थित होते. खेळाडूंना पै.संदीप कंखरे, योगेश शिरसाठ क्षितिज सोनवणे आदी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

दोन वर्षांपासून असोसिएशन करतेय काम
गेल्या 2 वर्षापासून स्टुडंट ओलंपिक असोसिएशनचे काम जळगाव जिल्ह्यात सुरु आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी असोसिएशन काम करत आहे. असोसिएशन 2 वर्षांपासून करीत असलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना नॅशनलपर्यंत जाता आले. याचा आनंद असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आठव्या स्टुडंट्स ओलंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहनही स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज