fbpx

जळगाव-पाचोरा संपर्क तुटला, अनेक वाहने खोळंबली

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. जळगाव ते पाचोरा दरम्यान पाथरी गावाजवळ नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने संपर्क तुटला आहे.

जळगाव ते पाचोरा हा मोठा रहदारीचा मार्ग आहे. औरंगाबाद रस्ता खराब असल्याने पुणे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने पाचोरामार्गे जात असतात. जळगाव ते पाचोरा मार्गाचे काम सुरु असून पाथरी गावाजवळ पुलाचे काम सुरु आहे. वडली ते पाथर्डी दरम्यान नाल्यावर एका पुलाचे काम सुरु असल्याने खालील बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नाल्याला पाणी आले असून पर्यायी मार्ग पाण्याखाली गेला आहे.

mi advt

पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने जळगाव ते पाचोरा संपर्क तुटला आहे. पुढील आणखी ४ तास पाणी कमी होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. जळगावहुन पाचोराकडे जाणारे वाहनधारक वावडदाकडून म्हसावदमार्गे पाचोरा येत आहेत. पावसाचा अंदाज घेत नागरिकांनी प्रवास टाळावा असे आवाहन जळगाव लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज