fbpx

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तब्बल ४०२ गावांमध्ये टंचाईची शक्यता

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात यंदा सलग दुसऱ्या वर्षी ऑक्टाेबर अखेरपर्यंत पाऊस सुरू हाेता. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवली नाही. परंतु एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तब्बल ४०२ गावांमध्ये टंचाई निर्माण हाेण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाष्पीभवन वाढले असून, नागरी वस्त्यांमध्ये पाण्याचा वापर, शेतीसाठी वापर वाढल्याने जलसाठा कमी झाला आहे. एप्रिल महिन्यात काही पाणीपुरवठा याेजना असलेल्या विहिरींची पाण्याची पातळी कमी हाेऊ शकते. त्यामुळे एप्रिल ते जून या टप्प्यात ४०० गावांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण हाेऊ शकते.

संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने खासगी विहीर अधिग्रहण, तात्पुरत्या याेजनांचे नियाेजन केले आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या टप्प्यात टंचाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांत प्रथमच जिल्ह्यात टंचाईच्या झळा एप्रिलनंतर जाणवू लागल्या आहेत. दाेन वर्ष पर्जन्यमान अधिक झाल्याने टंचाईचा काळ कमी झाला आहे. यापूर्वी ऑक्टाेबर महिन्यातच टंचाईची सुरुवात व्हायची. यंदा मात्र एप्रिलमध्ये ही स्थिती निर्माण झाली असून, केवळ खासगी विहीर अधिग्रहणातून टंचाई दूर हाेणार आहे. एरवी ४०० गावांना टँकरची गरज भासत हाेती; परंतु एप्रिलनंतरच्या टंचाईत ४०३ पैकी २६६ गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज