माहेश्वरी गणगौर मंडळाच्या अध्यक्षपदी जाखेटेंची निवड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । माहेश्वरी गणगौर महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी रोटरी भवन मायादेवीनगर येथे नुकतीच संपन्न झाली. यात नूतन अध्यक्षा सीमा जाखेटे यांनी अर्चना मंडोरा यांच्याकडून तर नूतन सचिव मितू मुंदडा यांनी तृप्ती लढ्ढा यांच्याकडून नूतन कार्यकारिणीसह पदभार स्वीकारला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस अर्चना मंडोरा व तृप्ती लढ्ढा यांनी प्रार्थना गायिली. श्रेया कोगटा यांनी स्वागत नृत्य केले. ईशा मंडोरा यांनी महेश वंदना प्रस्तूत केली. नूतन अध्यक्षा सीमा जाखेटे यांनी पदभार स्वीकारत आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली. हळदी-कुंकूचे औचित्य साधून पदग्रहण समारंभ झाला. माधवी आसावा व वंदना काबरा यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी गणगौर मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

कार्यकारिणीत अध्यक्षा सीमा जाखेटे, उपाध्यक्षा तृप्ती लढ्ढा, आयपीपी अर्चना मंडोरा, सचिव मितू मुंदडा, सल्लागार प्रमुख हेमा बियाणी, कोषाध्यक्षा कविता मालीवाल, जनसंपर्क प्रमुख स्नेहा मंत्री, सदस्यपदी रिंकू मालीवाल, सरिता झंवर, नीता मंत्री, अंकिता बाल्दी, निकिता जाजू, अर्चना राठी, नीतू बिर्ला, सल्लागार साधना कोगटा, अनिता मंडोरा, सुनीता दमाणी, अनिता मंत्री, वर्षाली मंडोरा, अलका लढ्ढा, रुची मणियार, मनिषा मंत्री, हेमा बियाणी, अर्चना मंडोरा.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -